आत्ता मी मिनॉपॉलिसच्या विमानतळावर गेट नं. १० वर बसलेली आहे.
गेट म्हणजे थोडक्यात काय तर फलाट. माझं मिनॉपॉलिसहून बाल्टिमोरला जायचं विमान इथे लागणार.
एस टी स्टँडवर बसणं आणि विमानतळावर बसणं यात मूळ स्तरावर काहीही फरक नाही. वातावरण बदलतं इतकंच. बाकी दोन्हीकडे लोकांचे हेतू सारखेच. एकीकडून दुसरीकडे जाणे. आणि मधला वेळ हा असा फलाटावर बसून घालवणं..म्हणजे वाचन, निरीक्षण, खाणं-पिणं, वगैरे.
पलीकडेच्या फलाटावर असणारी गर्दी आपल्या विमानाची वाट पाहात होती. काहीजण वाचत, काही कॉफ़ी पीत, तर काही..काही न करताच गेट उघडण्याची वाट पाहात होते. त्यातलं एक छोटंसं बाळ मजेत इकडे-तिकडे रांगत होतं. त्याची आई सारखी त्याला उचलून आणत होती...प्रेमानं दटावत होती. पण बाळ भारी खट्याळ...आईचा डोळा चुकवून ते आपलं वेगळ्याच दिशेनं परत रांगत सुटायचं.
त्यांच्या समोरच्याच रांगेत एक वयस्कर बाई बसल्या होत्या. बहुधा एकट्याच प्रवास करत असाव्यात. आजी मोठ्या रसिक दिसत होत्या. छान कलर केलेले केस..मेक-अप..गळ्यात मोत्यांची माळ..मोठ्या फुलांचं कानातलं..आणि हो..त्यांच्या त्या झग्याला शोभेल अशाच मोठी फुलं असणारया त्यांच्या चपला.
आता बाळानं मोहोरा इकडे वळवला, तो थेट आजीबाईंच्या चपलांकडे.
चपलांवरची ती मोठी रंगीत फुलं तोडावीत असं काहीतरी त्याच्या मनात असावं. छोटंसं पुस्तक वाचण्यात रमलेल्या आजी एकदम दचकल्या. घाबरून पायाकडं पाहतात तर काय..हे चिमणं मजेत त्यांच्या चपलांवरचं फूल धरून खेचत होतं. आजी झट्कन खाली वाकल्या. त्यांनी बोळकं पसरून हसणारया त्या बाळाला उचलून घेतलं. तेवढ्यात बाळाची आई आली. कौतुकानं आपल्या बाळाला दटावत आजींना sorry वगैरे म्हणाली. अगं ठीक आहे..चालायचंच..लहान आहे..इंग्रजीत आजी म्हणाल्या असाव्यात. एव्हाना बाळ आजीच्या मांडीत बसून त्यांच्या पर्सशी..मोठ्या फुलांच्या कानातल्याशी खेळत होतं. त्याला त्या रंगीत आजी भलत्याच आवडलेल्या दिसत होत्या. आजी मग काहीसं गाणं म्हणू लागल्या..आपल्या चिऊ-काऊ सारखं. माझा आपला एक अंदाज. बाळाची आई अगदी प्रेमानं बाळाकडं पाहात होती.
फार मोहक द्रुश्य होतं ते. मला वाटतं..वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.
त्यांच्या विमानाचं गेट उघडलं. बाळाच्या आईनं बाळाचा पसारा आवरला. त्या दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.
आजींनी आपल्या कानातली ती मोठाली फुलं काढून बाळाला दिली. बाळ खूश.
इकडे आमच्या फलाटाकडे मगाचपासून एक बाई आपल्या मुलीला सारखं खेकसत होत्या. ती ५-६ वर्षांची मुलगी सारखी खुरडत खुरडत इकडे-तिकडे जायला बघत होती. आणि तिची आई ओरडत, खेकसत, तिला ओढून, खरंतर फरपटत परत जागेवर आणत होती. त्या मुलीला ते आवडत नसावं. मोठ्या आवाजात ती आपला निषेध नोंदवत होती. विचित्र हातवारे करून आईला कहीसं सांगू पाहात होती. बराच वेळ हे चालू होतं. ती आई बिचारी लोकाच्या नजरा टाळत, मुलीला जागेवर बसवायला बघत होती.
मधेच समोरच्या रांगेतल्या खुर्च्यांकडे ती मुलगी गेली. तिथे एक तरुण मुलगा..पाठीला sack, पायाशी गिटार केस.. पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. अजून एक बाई laptopवर काहीसं काम करत होत्या.
ही मुलगी आईचा डोळा चुकवून त्यांच्यापाशी गेली. laptopवर काम करणारया बाईंपाशी उभं राहून laptop कडे बोट दाखवून, तिच्या भसाड्या आवाजात त्यांना काहीसं सांगू लागली. तिला laptop पाहून खूप आनंद झाला असावा. तिच्या तोंडातून गळणारी लाळ बाईंच्या पायावर पडत होती. बाईंचं लक्ष वेधून घ्यायला ती त्यांचा स्कर्ट ओढू पाहात होती. कामात गर्क बाई दचकल्या..त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं..आणि त्यांचा चेहरा एकदम बदलला. अतिशय किळसवाणी गोष्ट पाहिल्यासारखा चेहरा करून त्यांनी तिचा आपल्या गुडघ्यावरचा हात झटकला. ती बेसावध मुलगी जराशी हेलपाटली..घाबरली. तेवढ्यात तिची आई धावत आलीच. पडेल चेहरयानॆ, परत-परत माफी मागत राहिली. फरपटतच तिनं आपल्या मुलीला परत खुर्चीशी आणलं.
मुलगी तिच्या भसाड्या आवाजात किंचाळत होती..हात-पाय झाडत होती. आईच्या हातातून निसटून जायला पाहात होती. आई तिला सावरायचा प्रयत्न करत होती. तिचे कपडे नीट करत, तिच्या तोंडातून गळणारी लाळ पुसत होती. त्यांच्याकडेच पाहणारया आजूबाजूच्या माणसांची नजर चुकवायला बघत होती.
आधी राग..मग तिरस्कार..अगतिकता..आणि मग केवळ प्रेम. आईच्या चेहरयावरचे भाव झरझर बदलत होते.
एव्हाना स्वत: शांत होऊन, आईनं तिलाही शांत केलं होतं. एक मोठीशी बाहुली तिच्या हातात देऊन ती करुणेनं..प्रेमानं आपल्या मुलीकडं पाहात होती. ती मुलगी आपल्या त्याच भसाड्या आवाजात आईला काहीसं सांगत होती. त्या मायलेकी आता स्वत:च्याच विश्वात रमल्या होत्या.
ही एक आई..आणि मघाचीही आईच. हे आईचं प्रेम..आणि तेही तिचं प्रेमचं.
मला वाटतं..खरचं वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.
- सोनाली सुहास बेंद्रे

3 comments:
एकाच ठिकाणी एकाच वेळी दोन पूर्णत: भिन्न आई आणि मूल हे प्रसंग तसे दुर्मिळच असतात बघायला ! कॅलिडोस्कोप मधल्या रचनांसारखे वेगवेगळे. नेमक्या शब्दात मांडलं आहेस. असं काही वाचलं की 'आई' ह्या प्रकरणाची व्याप्ती ग्लोबल आहे हे पूर्णत: पटतं.
खरं आहे. हे दोन्ही प्रसंग मी एकाच विमानतळावर पुढेमागे टिपले. पण नंतर वाचताना त्यातील सुसंगती सापडली. लिखाणात रुपांतर करताना दोन्ही प्रसंगातले दुवे अजूनच पक्के केले.
सोनाली,
तुझ्या लेखांचे विषय मनाला हळवे करून जातात. मागील चांभार आणि आताचे "विमानतळावरील" प्रकरण ह्या दोन्ही गोष्टी अंतर्मुख करणाऱ्या आहेत. पुढेसुद्धा ह्या ब्लॉगवरील असेच सुंदर लेख वाचायला उत्सुक आहे.
- पवन
Post a Comment