अचानक वेदना सुरु होतात आणि कुठेतरी मनात जाणवतं की हेच ते. कदाचित तो क्षण आता कुठेतरी वळणावरच आहे.
दवाखाना .. ते वातावरण .. पण एक कोणतीतरी भिंत मध्ये उभी असल्यासारखं ते माझ्या मनापर्यंत पोहोचतच नाही. छातीतली धडधड मधेच वाढते .. कमी होते. आतलं ते हलणारं 'जीवन' प्रत्येक वेणेबरोबर स्वत:चं अस्तित्त्व सिध्द करतंय.
जसं काही आतून आवाज उमटतोय .. येऊ का?
सारा दिवस आणि उभी रात्र .. अशीच सरते वाट पाहण्यात.
सगळं जग झोपलेलं, शांत आणि नि:स्तब्ध. माझ्याबरोबर आलेली माझी माणसंही शांत झोपेच्या अधीन. मी मात्र टक्क जागी. रात्र वाढेल तसा वेदनेचा उत्सव अजूनच वाढतोय. मी आणि माझ्यातलं ते जीवन .. आमच्या दोघात वेदनेची एक लय बांधली जातीये. रात्रीच्या त्या नीरव शांततेत आपण दोघंही वाट बघतोय .. एकमेकांना सांगतोय की थांब, आता थोडक्यावरच आहे.
त्या लयीतच उजाडतं. सकाळ होते. माझी माणसं विचारतात, 'बरी आहेस ना? झोप लागली का?' त्यांना काय सांगणार? मी आणि तू .. आपला रात्रीतला तो संवाद .. आपण एकत्र भोगतोय त्या वेदना. त्यांना सांगून त्या कळाव्यात तरी कशा?
मी हसून म्हणते, 'बरीये.' तू पण आतून तेच म्हणलंस का?
दिवस चढेल तसा वेदनेचा एक अंगार उसळायला लागतो. एक वाढती आगच जशी काही. असं वाटतं की शरीर जसं काही पेटलयं. एक गरम वाफ अंग भाजून काढतीये. ही वाढती लय आता सोसत नाहीये. तुला होणारा त्रासही मला जाणवतोय. मला जाणवणारी .. पिळून काढणारी प्रत्येक वेणा तुलाही जशी पुढे ढकलतीये. तुझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आता जवळ येतोय.
आता मात्र मला थोड रागही येतोय. हा सर्व त्रास मला तुझ्यामुळे होतोय हे तुला माहितीये का? भिंतींवर हात आपटून मी तो व्यक्तही करतीये. मला खूप मोठ्यांदा ओरडावंसं वाटतंय. पण माझा सुस्कृंतपणा आड येतोय.
माझी माणसं आता काळजीत. कसं होणार हिचं? सगळं नीट होईल ना? पण मी मात्र आता त्या लयीशी समरस झालीये .. आणि तू पण.
माझा कण न कण .. माझा श्वास आणि मन सारंच एका झोक्यावर आहे. एकदा तो झोका असा उंच जातो की श्वास पुरत नाही. मन, संवेदना बधीरतात.
त्या हिंदोळ्यावर झुलताना मी सारं विसरलीये.
आजूबाजूचं जग .. त्यातली माणसं .. मी .. माझं शरीर .. सारं काही.
जाणवतंय ते फक्त तुझं अस्तित्त्व .. तुझा आकार .. तुझा वाढता जोर.
वरवर जाणारा उंच झोका ... एवढा उंच .. उंच.
माझे पाय जमिनीवरून कधीचेच सुटलेत.
माझं भान हरपलंय.
जगाशी संपर्क तुटलाय.
तुझ्या - माझ्यातली वेदनेची ती लय आता सम गाठतीये.
.......
थकलेलं शरीर .. पण उत्सुक मन .. तुला पाहायला, जाणून घ्यायला.
तू माझ्या हातात आणि मला ओळख पटते.
तू डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहातेस .. निरखून घेतेस.
तुलाही ओळख पटलीये बहुतेक. कारण तू परत डोळे मिटून निवांत होतेस. विश्वासून माझ्या कुशीत गुरफटून घेतेस.
सरल्या प्रवासाच्या वेदना .. त्या वेदनांच्या खुणा. ना तुझ्यावर .. ना माझ्यावर.
आपण दोघी एकमेकींतच गर्क. परस्परातले ओळखीचे धागे बांधण्यात हरवलेल्या.
माझी लोकं मात्र म्हणतात, सुटली बिचारी एकदाची, थकली असेल. शेवटी जीवातनं जीव बाहेर यायचा म्हणजे...
- सोनाली सुहास बेंद्रे

7 comments:
donhi lekh (nav-nirman aani viman phalat) utkrusht aahet. asech anek lekh yapudhehi vaachayla milatil ashi aasha aahe.
Beautiful!
काय म्हणू...
खरंतर माझ्याकडे शब्द्च नाहीत.अप्रतिम!
निसर्गाने / परमेश्वराने काही गोष्टी role specific ठेवल्यामुळे आम्हा पुरुषांना हा आनंद फक्त हे वाचूनच घेता येतोय ती संधी दिल्याबद्द्ल धन्यवाद!
एकदा मराठीतील उत्तमोत्तम विशेषणांची स्पर्धा भरली होती. त्यांत प्रत्येक विशेषण आपले गुणवर्णन करण्यात हिरहिरीने भाग घेत होते. अखेर परिक्षकांनी हा लेख तेथे वाचला आणि जयेच्छु विशेषणांस पुढे येण्याचे आवाहन केले.
ह्या लेखाचा दर्जा इतका चांगला आहे की सगळी उत्तम विशेषणं मुकाट्याने मान खाली घालुन घरी परतली.
मला सध्या एकच विशेषण सुचतेय - सुरेख!!!
आपले लेख असेच वेळोवेळी आम्हांस वाचवयास मिळोत.
सोनाली!!! केवळ महान.
Apratim!! :)
अतिशय सुरेख... हा अनुभव इतक्या नेमक्या शब्दात प्रथमच वाचायला मिळाला.
Post a Comment