Sunday, August 04, 2013

Happy Friendship Day

"Hiii, मी एकडे मागच्याच बंगल्यात राहातो. मला कळलं की तू माझ्याच class मध्ये आहेस. म्हणलं चला भेटावं." ५ मिनिटं झाली याचं तोंड आपलं चालू आहे! हा मुलगा इतकी बडबड कशी काय करू शकतो? खरंतर मी त्याला ओळखतही नव्हते. काय तर म्हणे आत्तापर्यंत काय काय झालंय... कोणत्या assignments झाल्यात. सांगशील का? च्यायला काय माणूस आहे हा? एकतर उशिरा join झाला 2nd year ला. आणि आता माझ्या कामामध्ये येउन मला पिडतोय. त्याच्या बडबडीने माझं डोकं आता पार हललं होतं. पण याला त्याचं काहीच नाही. आता तर तो माझ्या आईशीही अगदी प्रेमाने संवाद साधत होता. मला तर वाटू लागलं होतं की हा अगदी रस्त्यावरच्या दगडाशीही छान बोलू शकेल. या आईलाही काही कळत नाही. चहा काय विचारतीये. म्हणे येत जा. माझा राग-राग होत होता नुस्ता.


"बरं का गं आता आपण एकत्रच जात जाऊ college ला. submission पण करू एकत्रच. व्वा, मला वाटलं नव्हतं मला अगदी घराच्याजवळ मैत्रीण मिळेल." माझ्या परवानगीशिवाय, त्यानं आता मला मैत्रीण केलं होतं स्वत:ची... तिळपापड. "तुझे अजून कोण friends आहेत? माझी पण ऒळख करून दे ना. छान group होइल आपला!"

अरे... काय गळ्यात पडतोय हा? घुसायलाच बघतोय जबरदस्ती माझ्या group मध्ये. मला आमचा ५ जणींचा गेल्या एक वर्षात छान जमलेला group आठवला. त्यात हा? No way ...
"हे बघ ..." मी त्याला म्हणलं, "आमचा आधीच group आहे. आणि आम्ही आमच्यामध्ये असं कोणालाही नाही घेत." तो बघतच बसला माझ्याकडे. काय तोंडावर बोलतीये ही. त्याला वाटलं असावं. मग बाय वगैरे करून गेलाच तो. नंतर आई ओरडली मला. .. फ़टकळ आहेस अगदी. किती चांगला मुलगा आहे तो.

.....

अशी ही आमची पहिली ओळख. आज 17 वर्ष झाली या गोष्टीला. पण अजूनही आठवलं की आम्ही अगदी खो-खो हसतो. आज तो माझा अगदी घट्ट मित्र आहे. घट्ट म्हणजे किती हे न सांगता येण्याजोगा. मधले सात समुद्र आणि college नंतरची वर्ष यातूनही आम्ही आमचं हे मैत्रीचं नातं छान जोपासलंय. आमच्या या मैत्रीवर त्याची बायको म्हणते, तुम्ही लोक धन्य आहात. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या स्वप्नात वगैरे काय जाता अगं. इतकं कसं miss करता तुम्ही एकमेकांना!" तर मित्राचा phone झाल्यावर त्याच्याबद्दलची माझी अखंड बडबड ऐकून माझा नवरा म्हणतो ... तिकडे जाणार आहेस ना पुढच्या महिन्यात conference ला... मग ४ दिवस सुट्टी टाक आणि त्याच्याकडे राहा निवांत. पोटभर गप्पा मारा. मी बघतो लेकीचं सगळं...

.....
Happy Friendship Day मित्रा ...


- सोनाली सुहास बेंद्रे 

2 comments:

shri..! said...

khup mast

Chaitanya said...

Really we can't tag some relations..